मदत बटण
ऑड्यासिटी विकास माहितीपुस्तिकेवरून
मदत बटण
काही संवादांच्या पायथ्याशी असलेले चिन्ह आहे. क्लिक केल्यावर, ते आपणास माहितीपुस्तिकेमधील त्या संवादाविषयी संबंधित मदत माहितीवर घेऊन जाईल.
![Help Buttonl Help Buttonl](../m/images/d/d6/help_button.png)
त्रुटी संदेश
त्रुटी संदेशांसाठी मदत बटण आपल्याला विशिष्ट समस्येबद्दल थोडक्यात माहिती देते.बऱ्याचदा त्या पृष्ठावरील दुवे असतात. दुव्यांमधून आपणास बरेच काही मिळू शकते.
उदाहरण :
ध्वनी उपकरण संदेश उघडताना त्रुटी. या प्रतिमेच्या तळाशी उजवीकडे क्लिक करून पहा .
प्रभाव, जनरेटर्स आणि विश्लेषक - आणि प्राधान्ये
ऑड्यासिटीमध्ये सध्या प्रभाव, जनरेटर आणि विश्लेषक आणि प्राधान्यांसाठी पृष्ठांवर मदत बटणे आहेत.या बटणावर क्लिक केल्याने तुम्हाला प्रभाव/जनरेटर/विश्लेषक किंवा माहितीपुस्तिकेमधील प्राधान्य विभागासाठी पृष्ठावर नेले जाईल.
उदाहरण :
विस्तारित प्रभाव. या प्रतिमेच्या तळाशी उजवीकडे क्लिक करून पहा.